• शासन निर्णय :
1. शासन निर्णय क्रमांक : सामाजिक न्याय विभाग, बीसीएच -१०८१/ २९२८०/ ४५० दिनांक : १७ नोव्हेंबर १९८३
2. शासन निर्णय क्रमांक : इबीसी – २००३/ प्र. क्र. ३११/ मावक -२ दिनांक : ९ जून २००३
• उद्दिष्ट व स्वरूप:
वैद्यकीय अभियांत्रिकी, कृषी इत्यादी व्यावसायिक अभ्यासक्रमातील महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जातीमधील विद्यार्थ्यांना भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती या योजनेअंतर्गत वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना रु. २३५ ते रु ७४० निर्वाह भत्ता दिला जातो. व्यवसायिक पाठ्यक्रमाशी संलग्न असणाऱ्या महाविद्यालयातील वसतिगृहात राहणाऱ्या अनुसूचित जातीचे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती द्वारे मिळणाऱ्या निर्वाहभत्यातून व्यावसायिक पाठ्यक्रमाची पुस्तके, स्टेशनरी, निवास, भोजन, इत्यादी बाबींचा खर्च भागवू शकत नाहीत. व्यावसायिक पाठ्यक्रमाशी संलग्न असणाऱ्या महाविद्यालयाच्या वसतिगृहात, शासकीय वसतिगृहात व इतर वसतिगृहात राहतात अशा विद्यार्थ्यांना भारत सरकार शिष्यवृत्ती च्या व्यतिरिक्त या योजनेअंतर्गत निर्वाहभत्ता खालील प्रमाणे देण्यात येतो.
| अ.क्र. |
अभ्यासक्रमाचे नाव |
निर्वाहभत्याचा प्रतिमाह दर |
कालावधी |
| व्यावसायिक पाठ्यक्रमाशी संलग्न असणाऱ्या / वसतिगृहात राहणाऱ्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना विद्यावेतन |
| १ |
चार ते पाच वर्षाचे अभ्यासक्रम वैद्यकीय / अभियांत्रिकी / पशु वैद्यकीय , वास्तुशास्त्र इ. |
रु. ७००/- |
१० महिने |
| २ |
दोन ते तीन वर्षाचे अभ्यासक्रम अभियांत्रिकी पदविका, एम.बी.ए, एम.एस.डब्लू इ. |
रु. ५००/- |
१० महिने |
| ३ |
दोन वर्ष किंवा त्यापेक्षा कमी कालावधीचे अभ्यासक्रम बी.एड, डी.एड इ. |
रु. ५००/- |
१० महिने |
| बाहेर राहणाऱ्या परंतु वसतिगृहात प्रवेश मिळण्यास पात्र असणाऱ्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना विद्यावेतन |
| १ |
चार ते पाच वर्षाचे अभ्यासक्रम वैद्यकीय / अभियांत्रिकी / पशु वैद्यकीय , वास्तुशास्त्र इ. |
रु. १०००/- |
१० महिने |
| २ |
दोन ते तीन वर्षाचे अभ्यासक्रम अभियांत्रिकी पदविका, एम.बी.ए, एम.एस.डब्लू इ. |
रु. ७००/- |
१० महिने |
| ३ |
दोन वर्ष किंवा त्यापेक्षा कमी कालावधीचे अभ्यासक्रम बी.एड, डी.एड इ. |
रु. ५००/- |
१० महिने |
• शासन निर्णय डाऊनलोड करा
शासन निर्णय २००३
• संपर्क : संबंधित जिल्ह्याचे, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, अकोला.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी
www.mahadbtmahait.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज भरणेआवश्यक आहे.