class="home page-template page-template-home-template page-template-home-template-php page page-id-11 page-parent inspiry-themes inspiry-medicalpress-theme" data-spy="scroll" data-target=".navbar" data-offset="50">

• शासन निर्णय :-
शासन निर्णय क्र. दवसू – 2015/प्र.क्र. 347/अजाक/दिनांक 09 मार्च 2018

• लाभाचे स्वरूप
1. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेंतर्गत नागरी व ग्रामीण भागातील अनुसुचीत जाती व नवबौद्ध घटकांच्या विकासासाठी मुलभूत सुविधा पुरविण्यासाठी सदर योजना शासन निर्णय क्र. दवसु 2015 / प्र. क्र. 347 / अजाक मंत्रालय मुंबई दिनांक. 09 मार्च 2018 अन्वये सन 2018-19 या आर्थिक वर्षापासून योजना सुरु करण्यात आलेली आहे.
2. मा. लोकप्रतीनिधिनी सुचविलेली कामे संबंधित लोकप्रतिनिधी ज्या कार्यालयीन यंत्रणेकडून कार्यान्वित करावयाची आहेत त्या कार्यान्वित यंत्रणेचे नाव तसेच यंत्रणेची तत्वत: मंजुरी अंदाजित किमतीच्या कामांचे सविस्तर नकाशे व अंदाजपत्रके संबंधितानी सादर केल्यानुसार मा.जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रशासकीय मान्यतेसाठी सादर करण्यात येतात.
3. अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील वस्ती सुधार योजनेतंर्गत निधी प्राप्त होऊनही पुरेशा निधीअभावी गावातील/वस्त्यांमध्ये विकास कामे पुरेशा प्रमाणात झालेली नाहीत अशा भागातील लोकप्रतिनिधीना त्यांनी मागणी केल्याप्रमाणे ग्रामविकास, अल्पसंख्याक आणि नगर विकास विभागाच्या धर्तीवर शासन स्तरावरुन थेट निधी उपलब्ध करुन देण्याची राज्यस्तर योजना आहे.
4. या योजने करीत लोकप्रतिनिधी म्हणून केवळ विद्यमान खासदार व आमदार यांच्याच प्रस्तावाचा विचार होईल

• योजनेतंर्गत घ्यावयाची कामे
1. सदर योजनेतर्गत अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्तीतील / गावातील आणि पुरवठा, मलनि:सारण, पोहोच रस्ते, अंतर्गत रस्ते, गटार बांधणे, स्मशान भूमीचा विकास करणे, पथदिवे, पर्जन्य पाण्याची निचरा, सार्वजनिक सुलभ शौचालये, ग्रंथालय / अभ्यासिका, व्यायाम शाळा या व्यतिरिक्त स्थानिक वस्तीतील रहिवाशांच्या गरजा लक्षात घेता विकास कामांना समावेश शासन स्तरावरुन करण्यात येईल.

• शासन निर्णय डाऊनलोड करा

शासन निर्णय २०१८

शासन निर्णय १२ नोव्हेंबर २०१८

शासन निर्णय ६ मार्च २०१९

शासन निर्णय १६ ऑगस्ट २०१९

शासन निर्णय ६ सप्टेंबर २०१९

शासन निर्णय २६ मार्च २०२०

शासन निर्णय ३१ मार्च २०२०

शासन निर्णय २९ ऑक्टोबर २०२०

अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे

माहिती दर्शविणारा तक्ता