class="home page-template page-template-home-template page-template-home-template-php page page-id-11 page-parent inspiry-themes inspiry-medicalpress-theme" data-spy="scroll" data-target=".navbar" data-offset="50">

• शासन निर्णय :-
1. शासन निर्णय क्र. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग/ तृतीय-2018/प्र.क्र.26/सामासू/दिनांक 13 डिसेंबर 2018
2. शासन निर्णय क्र.:-तृतीय-2018/प्र.क्र.26/सामासु दिनांक 08 जून 2020

• उद्दिष्ट:
1. तृतीयपंथीय / ट्रान्सजेंडर यांना कायद्याने निश्चित अशी ओळख / स्थान मिळवून देणे व त्यासाठी शासनाच्या विविध विभागांकडे पाठपुरावा करणे.
2. तृतीयपंथीयांना सामाजिक संरक्षण प्राप्त करुन देणे.
3. तृतीयपंथीयांच्या मानवी हक्कांची पायमल्ली होवू नये यासाठी उपाययोजना करणे.
4. तृतीयपंथीयांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देवून त्यांचा आर्थिक व सांस्कृतिक विकास घडवून आणणे.
5. तृतीयपंथीयांच्या विकासासाठी त्यांना संघटीत करणेकरिता प्रयत्न करणे.
6. तृतीयपंथीयांना समाजाच्या मुख्य प्रवाहात सामावून घेणे.

• लाभाचे स्वरूप
राज्यातील तृतीयपंथीय व्यक्ती हा समाजातील एक दुर्लक्षित घटक असून, या घटकास समाजाकडून सापत्न व भेदभावाची वागणूक दिली जाते सापत्न वागणुकीमुळे समाजातील हा घटक विकास प्रक्रियेपासून दुर्लक्षित असल्याने तृतीयपंथीयांच्या कल्याणासाठी व त्यांच्या हक्कांचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने त्यांचे मुलभूत अधिकारांचे संरक्षण करण्याबाबत संरक्षण आणि कल्याण मंडळ स्थापन करण्यात आले आहे.

• शासन निर्णय डाऊनलोड करा

शासन निर्णय २०१८

अधिक माहिती दर्शविणारा तक्ता