class="home page-template page-template-home-template page-template-home-template-php page page-id-11 page-parent inspiry-themes inspiry-medicalpress-theme" data-spy="scroll" data-target=".navbar" data-offset="50">

• शासन निर्णय :
1) शासन निर्णय सामाजिक न्याय, सांस्कृतिक कार्य, क्रीडा व विशेष सहाय्य विभाग, क्रमांक बी. सी. एच. २००२ / प्र. क्र. २६८/ मावक -४ , दिनांक ४ जुलै, २००३
2) शासन निर्णय, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, क्रमांक बी. सी. एच. २०११/ प्र. क्र. २११/ मावक -४, दिनांक २९ जून, २०११

• उद्दिष्ट:
1. आर्थिक परिस्थितीमुळे अनुसूचित जातीच्या व नवबौद्ध मुला-मुलींना प्राथमिक व माध्यमिक शिक्षण घेता येत नाही. अशा मुला- मुलींच्या शिक्षणाची सोय व्हावी म्हणून प्रत्येक तालुक्यात एक शासकीय निवासी शाळा सुरु करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. ३५३ शासकीय निवासी शाळा पैकी प्रथम टप्प्यात १०० शासकीय निवासी शाळा सुरू करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे. त्यापैकी ८० निवासी शाळा सुरू आहेत.
2. निवासी शाळेमध्ये इयत्ता ६ वी ते १० वी पर्यंतच्या अनुसूचित जाती व नवबौद्ध मुला-मुलींना प्रवेश दिला जात आहे. जून २०११ पासून इयत्ता ५ वी ते ७ वीचे वर्ग सुरू करण्यात आले असून सन २०१२ ते २०१३ या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता ८ वी व त्यानंतर नैसर्गिक वर्गवारीनुसार इयत्ता ९ वी व १० वी चे वर्ग सुरू करण्यात येणार आहेत.
3. निवासी शाळेत मोफत भोजन , निवास , ग्रंथालयीन सुविधा व इतर आवश्यक शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

• संपर्क
1. संबंधित जिल्ह्याचे, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण
2. संबंधित मुख्याध्यापक, शासकीय निवासी शाळा
3. संबंधित जिल्ह्याचे गट शिक्षणाधिकारी, पंचायत समिती
4. संबंधित जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी ( माध्यमिक ) , जिल्हा परिषद
5. संबधित विभागाचे प्रादेशिक उप्पायुक्त सामाज कल्याण

• शासन निर्णय डाऊनलोड करा

शासन निर्णय २००६
शासन निर्णय २०११
शासन निर्णय २०११

अर्जाचा नमुना

अ.क्र. शासकीय निवासी शाळेचे नाव अधिक माहिती
1 अनुसूचित जाती मुलांची शासकीय निवासी शाळा पाटसूल ता. अकोट जि. अकोला अधिक माहिती
2 अनुसूचित जाती मुलांची शासकीय निवासी शाळा शेलूवेताळ ता. मूर्तिजापूर जि. अकोला अधिक माहिती
3 अनुसूचित जाती मुलींची शासकीय निवासी शाळा शेळद ता. बाळापूर जि. अकोला अधिक माहिती
4 अनुसूचित जाती मुलींची शासकीय निवासी शाळा गोरेगांव खुर्द जि. अकोला अधिक माहिती